Sanjay Raut on Hanuman Chalisa: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू करण्यासाठी भोंग्याचं राजकारण केलं जात आहे. हा सर्व प्रकार पुढील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कण्यात येत आहे. भोंग्यावरून राज्यातील वातावरण बिघडवलं जात आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, यापूर्वी कधीच हनुमान जयंती आणि राम नवमीला हिंसा झाली नाही. या घटनांवर पंतप्रधान गप्प का? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला. पंतप्रधानांनी देशातील एकतेवर बोलण्याची गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूरातील निकालाने या सर्वावर सडेतोड उत्तर दिलं आहे, अशी टिप्पण्णीदेखील संजय राऊत यांनी केली आहे. (हेही वाचा - Kirit Somaiya On Toilet Scam: शौचालय घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या यांचे पत्र, कारावाईआधीच बाजू सावरण्याचा प्रयत्न)
देश का माहौल जानबूझकर चुनाव जीतने के लिए जिस तरह से खराब किया जा रहा है, मुझे लगता है यह देश के लिए ठीक नहीं है। दिल्ली में कल हनुमान जयंती और रामनवमी पर हमला हुआ था इससे पहले यह कभी नहीं हुआ करता था...: शिवसेना के नेता संजय राउत, मुंबई, महाराष्ट्र pic.twitter.com/tsdGj6RkJn
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2022
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी ज्या प्रकारे देशातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवले जात आहे. ते देशासाठी चांगले नाही, असे मला वाटते. काल दिल्लीत हनुमान जयंती आणि रामनवमीच्या दिवशी हल्ला झाला. यापूर्वी कधी झालं नव्हतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.