भिवंडी: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, टँकरच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू
Accident Representational image (PC - PTI)

भिवंडीतील (Bhiwandi) मुंबई- नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik highway) एलपीजीग गॅस टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक (Road Accident) दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, टॅंकर चालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच टॅंकर चालकाचाही शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील एलपीजी गॅस टॅंकर मुंबईच्या दिशेने जात होता. मात्र, नाशिक महामार्गावर सोनाळे गावाच्या हद्दीत ताबा सुटल्याने टॅंकर चालकाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामुळे दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबई- नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Yavatmal: दारूची तहान भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले, यवतमाळ येथील 7 जणांचा मृत्यू

यवतमाळ येथे काही दिवसांपूर्वी चारचाकी गाडी झाडावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात गाडीतील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, एक जणाला दुखापत झाली होती. यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील पारवा गावाजवळ ही दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.