Bhiwandi Accident: भिवंडीत Hit and Run प्रकरणी महाराष्ट्र पोलिसाचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

Bhiwandi Accident:  ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत 31 वर्षीय कॉन्स्टेबलचा (Constable) भरधाव वेगाने आलेल्या गाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटरसायलने पोलिसाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भिवंडी तालुका पोलीस स्थानकातील (Bhiwandi Police Station) सतिश चव्हाण हे आपल्या घरी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.(Bhiwandi Murder: भिवंडी येथे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेची हत्या; पोलीस तपास सुरू)

सतीश चव्हाण हे शनिवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले होते. तर मुंबई-नाशिक महामार्गावरील मानखोली ब्रिजवर हा अपघात घडल्याची माहिती उपनिरीक्षक एसबी गणेशकर, नारपोली पोलीस स्थानक यांच्याकडून देण्यात आली. या दुर्घटने प्रकरणी मोटरसायकल चालकाचा पत्ता लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Nala Sopara Train Accident: नालासोपारा येथे रेल्वे अपघातात तीन जणांचा मृत्यू तर एकजण जखमी)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुंबई मध्ये ओशिवरा परिसरामध्ये एक दुर्देवी अपघाताची घटना घडली होती. तर  मर्सिडीज कारच्या धडकेमध्ये एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्या मुलाला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संबंधित घटनेनंतर पोलिसांनी कार ड्रायव्हरला अटक केली होती. या प्रकरणी मृत मुलाच्या कुटुंबियांकडून हा अपघात कार रेसिंगच्या प्रयत्नातून झाल्याचे म्हटले. मर्सिडीज कार मध्ये 3-4 लोक होते. तसेच मर्सिडीज कार ओव्हर स्पिडींग करत होती. यामध्येच कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि डिवायडर ओलांडून गाडी स्कुटर चालवणार्‍याला धडकली यामध्ये डिलिवरी बॉय असलेल्या मुलाचा नाहक जीव गेल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे.