Nala Sopara Train Accident: नालासोपारा येथे रेल्वे अपघातात तीन जणांचा मृत्यू तर एकजण जखमी
नालासोपारा येथे दोन अल्पवयीन मुलांसह त्यांची आई नालासोपाराल आणि वसई रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेल्या ट्रॅकवर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nala Sopara Train Accident: नालासोपारा येथे दोन अल्पवयीन मुलांसह त्यांची आई नालासोपाराल आणि वसई रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेल्या ट्रॅकवर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती.(दापोली: आंजर्ले समुद्र मध्ये 6 पुण्याचे पर्यटक बुडाले; स्थानिकांच्या मदतीने 3 जणांना वाचवण्यात यश)
वसईतील जीआरपी (GRP) यांनी असे म्हटले की, या तिघांनी धावत्या ट्रेनच्या समोर उडी टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर मुलासह आईचा मृतदेह ट्रेनच्या अपघातामुळे अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आला. तसेच मुलीचा ही यामध्ये मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.(Oshiwara Road Accident: मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत 19वर्षीय फूड डिलेवरी बॉयचा मृत्यू; चालक अटकेत)
Tweet:
Maharashtra: Three dead & one injured in a freight train accident near Nala Sopara Railway Station, earlier today.
"Prima facie, it seems to be an accident. We have registered a case. The deceased were residents of Virar area. Probe underway," says Police. pic.twitter.com/Ivo1n73PY0
— ANI (@ANI) December 19, 2020
दरम्यान, तिघांचे मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले. तर प्रथमदर्शी या प्रकरणी असे वाटते की, अपघात आहे. या प्रकरणाची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील लोक हे विरार मधील स्थनिक रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर अपघाताप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2020 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

