Bhiwandi Building Collapsed: भिवंंडी बिल्डिंग दुर्घटनेत एकुण 41 जणांचा मृत्यु, 4 दिवसांंनी आज थांंबले बचावकार्य
Bhiwandi Building Collapse (Photo Credits: Twitter)

भिवंडी (Bhiwandi) येथील पटेल कंपाउंड मधील जिलानी नामक इमारत 21 सप्टेंबर (सोमवारी) पहाटे कोसळली होती, अगदी पत्त्याप्रमाणे कोसळलेल्या या बिल्डिंगच्या ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले होते. या रहिवाशांंसाठी 21 तारखेपासुन NDRF च्या पथकाने बचावकार्य आरंंभले होते, आज चार दिवसानंंतर अखेरीस हे कार्य थांंबवण्यात आले आहे. आज सकाळी 11.45 मिनिटांंनी एनडीआरएफ ने बचावकार्य थांंबवले असुन या दुर्घटनेतील मृतांंचा ठोस आकडा 41 इतका झाला आहे. प्राप्त माहितीनुसार ही इमारत 43 वर्ष जुनी होती, मात्र तरीही ती धोकादायक इमारतींंच्या यादीत मोडली जात नव्हती,अशावेळी अचानक इमारत कशी कोसळली हा अजुनही प्रश्नच आहे. Viral Video of Bhiwandi Building Collapse: भिवंडी दुर्घटनेत तब्बल 10 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर आलेल्या खालिदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जिलानी इमारतीत 40 फ्लॅट्स होते आणि या सगळ्या घरात मिळुन तब्बल 100 ते 120 रहिवाशी राहत होते.ज्यावेळी इमारत कोसळली तेव्हा सुरुवातीला 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते दुसर्‍या दिवशी ही संख्या 20 आणि मग आजच्या शेवटच्या दिवशी एकुण मृतांंची संख्या 41 इतकी झाली आहे. जखमींंवर उपचार सुरु आहेत.

ANI ट्विट

भिवंंडी इमारत दुर्घटनेनंंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, पंंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंंत्री अमित शाह, यांंसहित अनेक राजकीय नेत्यांंनी सुद्धा ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. जखमींंना योग्य ती मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र मुख्यमंंत्री कार्यालयातुन निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा पालकमंंत्री एकनाथ शिंंदे यांंनी सुद्धा घटनास्थळी जाउन पाहणी केली होती.