ठाणे जिल्ह्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) शहरातील पटेल कंपाऊंडमधील (Patel Compound) जिलानी तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. दरम्यान, एनडीआरफचे पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरुच आहे. तसेच या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहेत.
ही इमारत 43 वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील 40 फ्लॅट्समध्ये 100- 120 रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. हे देखील वाचा- Godavari River Water Rises: गोदावरी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह 337 गावांना सतर्क राहण्याचे अशोक चव्हाण यांचे निर्देशन
एएनआयचे ट्वीट-
#UPDATE Maharashtra: Death toll rises to 10 in the building collapse incident in Bhiwandi, Thane which took place earlier today.
Rescue operation by NDRF (National Disaster Response Force) still underway. pic.twitter.com/MXHBlJQWWg
— ANI (@ANI) September 21, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत साधारण 25 कुटुंब राहात होते. या भयंकर घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.