डॉ. आनंद तेलतुंबडे यांना तात्पुरता दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत अटक टळली
डॉ. आनंद तेलतुंबडे | (Photo Credit: ANI)

Bhima Koregaon: ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद तेलतुंबडे ( Anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. डॉ. तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या अटकेासून संरक्षण मिळाले आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक तात्पुरती टळली असली तरी, पुढे काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

नक्षलावाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा यासाठी यासाठी पोलिसांच्या कारवाईविरुद्ध डॉ. तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर डॉ. तेलतुंबडे यांच्यावर 11 फेब्रुवारीपर्यंत कोणत्यीही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, डॉ. तेलतुंबडे यांनी वकील अॅड. रोहन नहार आणि अॅड. पार्थ शहा यांच्या मार्फत शिवाजीनगर सत्र न्यायालयातील न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने अर्ज फेटाळून लावताच पुणे पोलीसांनी डॉ. तेलतुंबडे यांना लागलीच अटक करुन विशेष न्यायालयात हजर केले होते.

आनंद डॉ. तेलतुंबडे हे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक आहेत. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे माओवादी आणि त्यांच्याशी संबांधीत विविध समाजातील व्यक्ती असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या आरोपानंतर देशभारतील काही ठिकाणांहून पुणे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या व्यक्तिंमध्ये आनंद डॉ. तेलतुंबडे यांचाही समावेश होता. (हेही वाचा, न्यायालयाचा पुणे पोलिसांना दणका, आनंद तेलतुंबडे याची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांना सोडण्याचे आदेश)

पोलिसांनी केलेल्या अटक आणि कारवाईविरुद्ध संरक्षण मिळावे यासाठी मुंबई डॉ. तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी (5 फेब्रुवारी) सुनावणी झाली. न्यायालयाने सुनावणीवेळी आनंद डॉ. तेलतुंबडे यांची बाजू ऐकूण घेत त्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून स्वातंत्र्य दिले. दरम्यान, न्यायालयाने शनिवारीच पुणे पोलिसांवर ताशेरे ओढत डॉ. तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. सध्यस्थितीत डॉ. तेलतुंबडे तुरुंगाबाहेर आहेत.