Bhima Koregaon Case: भीमा कोरोगाव प्रकरणी कबीर कला मंचाच्या गायिका ज्योती जगताप यांना पुणे येथून अटक
Koregaon Bhima | (Picture courtesy: Wikipedia)

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र ATS कडून मंगळवारी कार्यकर्त्या आणि कबीर कला मंचाच्या गायिका ज्योती जगताप यांना पुणे येथून अटक ज्योती राघोबा जगताप (Jyoti Raghoba Jagtap) यांना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. 2017 मध्ये एल्गार परिषद कार्यक्रम आयोजित केलेल्या एका गटाने याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी असे ही म्हटले आहे की, तिचा ताबा NIA कडे दिला जाणार आहे. जगताप ही भीमा कोरोगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान ग्रुपची सदस्या सुद्धा आहे. याआधी NIA कडून कार्यकर्ते सागर गोरखे ( Sagar Tatyaram Gorkhe) आणि रमेश गायचोर (Ramesh Murlidhar Gaichor) यांना अटक केली आहे. भीमा कोरोगाव प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे ATS ने ज्योती जगताप हिला अटक केल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता तिचा ताबा NIA कडे दिला जाणार आहे. जगताप, गोर्खे आणि गायचोर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात पुण्यातीलच एका रिलेटर याने प्राथमिक माहिती रिपोर्ट 2018 मध्ये दाखल केला होता. तक्रारदाराने असे म्हटले होते की, भडकवणारे भाषण दिले होते. तर जुलै महिन्यात NIA ने गोर्खे, गायचोर यांच्यासह अन्य काही जणांना चौकशीसंदर्भात समन्स पाठवले होते. तसेच दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हन्या बाबू यांना सुद्धा अटक केली होती.(भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी: डॉ. संजय लाखे पाटील)

सोमवारी अटक करण्यापूर्वी व्हिडिओ असे दिसून आले की, गोर्खे आणि गायचोर यांना NIA कडून या प्रकरणी अटक झालेल्यांना दोषी ठरवण्यासाठी स्टेटमेंट देण्यास जबरदस्ती करत होते. ऐवढेच नाही तर जर यांनी प्रकरणातील साक्षीदार म्हणून मान्य न केल्यास त्यांना अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केली आहे. गोर्खे आणि गायचोर यांच्यासह 23 जणांवर एल्गार परिषद प्रकरणात दहशतविरोधी कायदा, बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पुणे शहर पोलिसांनी कारवाई केली होती.