भीमा कोरोगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांचा वैद्यकिय अहवाल NIA, राज्य सरकारने सादर करावेत- बॉम्बे हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

भीमा कोरोगाव प्रकरणातील (Bhima Koregaon case)  आरोपी वरवरा राव (Varvara Rao) यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता बॉम्बे हायकोर्टाने NIA आणि राज्य सरकारला वरवरा राव यांच्या वैद्यकिय रिपोर्ट्स सादर करावे असे निर्देशन दिले आहेत. वरवरा राव यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Varavara Rao Tests Positive For Coronavirus: भीमा कोरेगाव प्रकरणी तुरूंगात असलेल्या वरवरा राव यांना कोरोना विषाणूची लागण)

राव हे गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईतील तळोजा कारागृह कैद आहेत. यापूर्वी या तुरुंगातील एका कैद्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. तर वरवरा राव यांना उपचारासाठी दाखल केले असता जेजे रुग्णालयाचे डीन रणजित मानकेश्वर यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले होते.(ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी महापालिका विभागातील कंटेनमेंट झोन मध्ये आज पासून 31 जुलै पर्यंत Lockdown)

राव सुमारे 22 महिने तुरूंगात आहेत आणि यापूर्वी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव आणि सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे जामीन मिळण्यासाठी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली होती. 26 जून रोजी एनआयए कोर्टाने बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कडक तरतुदींनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे कारण देत त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.