79 वर्ष वयाच्या भिकूबाई बागुल नाशिकच्या उपमहापौरपदी निवड
भिकुबाई बागुल (Photo Credits: Twitter/RushikeshJAher)

महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये आज महापौर पदासाठी निवडणुका पार पडल्या. त्यामधील नाशिक महापालिकेतील महापौर निवडणुका भलतीच गाजली ती म्हणजे मनसे ने भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फेल ठरवत, भाजपनं सत्ता हातात घेतली आहे. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकमध्ये महापौरपदासाठी 11 तर उपमहापौरपदासाठी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु अंतिम क्षणी सर्व उमेदवारांनी हे अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे नाशिकमध्ये उपमहापौरपदी भाजपच्या भिकुबाई बागुल यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या भिकूबाई बागुल तब्बल 79 वर्षांच्या आहेत. उपमहापौरपदी विराजमान झालेल्या भिकुबाई या भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील बागुल यांच्या आई आहेत. आणि मुख्य म्हणजे त्या महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वयाच्या उपमहापौर ठरल्या आहेत.

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर; तर सुहास वाडकर उपमहापौर पदी विराजमान

दरम्यान, भाजपचे बंडखोर नगरसेवक कमलेश बोडके यांनी शिवसेनेला साथ देत महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. हा भाजपाला मिळालेला सर्वात मोठा धक्का मानला जात होता. परंतु भाजपने या धक्क्यावर मत करत आपल्या सर्व फुटलेल्या नगरसेवकांना परत मिळवलं आणि मतदानाच्या वेळी भाजपाकडे संख्याबळाचा एकदा वाढला.