Bhendwal Bhavishyavani 2019: 'भेंडवळ घटमांडणी' चा अंदाज जाहीर; पावसाची स्थिती सर्वसाधारण तर देशात सत्ता स्थिर राहणार असल्याचे भाकीत
Bhendwal Bhavishyavani 2019 (Photo Credits: You Tube)

Bhendwal 2019 Predictions: महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाची (Drought) स्थिती असताना शेतकर्‍यांना पुढील वर्षी पाऊस कसा असेल? याची उत्सुकता होती. पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) विदर्भामध्ये (Vidarbha) शेतकर्‍यांमध्ये याविषयीचा अंदाज देणारा भेंडवळची घटमांडणीच्या निकालाची (Bhendwal Bhavishyavani)  उत्सुकता होती. मात्र यंदादेखील सरासरीपेक्षा पाऊस (Rain) कमी पडणार असल्याचा अंदाज भेंडवळ घटमांडणीमधून समोर आला आहे.  यंदाच्या वर्षात कमी पावसाची शक्यता, स्कायमेट हवामान खात्याचा अंदाज

भेंडवळ घटमांडणी 2019 चा अंदाज काय सांगतोय?

पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. त्यामुळे पिकांची स्थितीदेखील सर्वसाधारण राहणार आहे.

अवकाळी पाऊस, चाराटंचाई होण्याची भीती

आर्थिक संकटाची भीती

नैसर्गिक आपत्तीची शक्यता

घुसखोरीला भारत चोख प्रत्युत्तर देईल.

(महाराष्ट्र दुष्काळ निवारण निधीमध्ये केंद्र सरकारची 2160 कोटीची अधिक मदत)

भेंडवळ घटस्थापना म्हणजे काय?

अक्षय मुहूर्ताच्या संध्याकाळी बुलढाण्यातील भेंडवळ येथे गावकरी शेतामध्ये 18 विविध धान्यांची पेरणी करतात. या प्रतिकात्मक मांडणीमधून समोर आलेल्या निकालामधून पाऊसपाणी, शेती पासून देशाच्या राजकीय स्थितीबद्दल अंदाज व्यक्त केला जातो. भेंडवळच्या घटमांडणी ही सुमारे 300 वर्ष जुनी प्रथा आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांचा या घटमांडणीच्या निरीक्षणाच्या अंदाजावर विश्वास आहे.