![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/bharat-bandh-by-left_b8d198d8-b5a7-11e6-b935-511f3378ef5e-380x214.jpg)
देशभरातील शेतक-यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात (Farm Bills) पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून समर्थन मिळत आहे. गेले 12 दिवस नवी दिल्लीत शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतरही (Farmers Protest) योग्य तो तोडगा न निघाल्याने आज शेतक-यांनी 'भारत बंद' (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. या दरम्यान देशभरातून शेतक-यांच्या आंदोलनाला समर्थन दिले असले तरीही लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक व्यापा-यांचे, दुकानदारांचे नुकसान झाल्याने अनेकांनी या भारत बंदास पाठिंबा दर्शवलेला नाही. या भारत बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यासाठी कडक पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील शेतक-यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. तर काही व्यापारी संघटनांनी आणि दुकानदारांनी या पाठिबां दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आजच्या भारत बंदात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याची माहिती करुन घेणे गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Bharat Bandh: शेतक-यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' शी संबंधित 'ही' आहे महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात आज काय सुरु राहणार?
1. ऑटो, टॅक्सी, रेल्वे सुरळीत सुरु
2. अत्यावश्यक सेवा सुरु
3. पुण्यातील दुकानं सुरु राहणार
4. मुंबईत बेस्ट बस सेवा, टॅक्सी युनियन आणि ऑटो रिक्षा सुरु
महाराष्ट्रात आज काय बंद राहणार?
1. दादरचे भाजी मार्केट सुरु तर फुल मार्केट बंद
2. नवी मुंबईतील APMC मधील पाचही बाजार समित्या बंद
3. पिंपरी, चाकण बाजार समिती बंद
4. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आद बंद
5. संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद
6. नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूर मधील बाजार समित्या बंद
7. राज्यातील बाजार समित्या बंद
8. राज्यात दूध, फळ, भाजीपाला वाहतूक बंद
9. पुणबंद्यात कडकडीत बंद
बळीराजाने पुकारलेल्या या भारत बंदला विरोधी पक्षासह अनेक सेलिब्रिटी, खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. मात्र मुंबईत आज अनेक वाहतूकीच्या सेवा सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी मुंबईत भारत बंदला पाठिंबा देण्यात आलेला नाही.