
Crime News: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गाव हादरुन गेले आहे. या गावात चक्क सासऱ्यानेच आपल्या सुनेची (Daughter-in-law) हत्या केली आहे. स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसलेल्या सासऱ्याने चिमुकल्या नातवासमोर त्याच्या आईवर म्हणजेच आपल्या सुनेवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. प्रणाली सतीश ईश्वरकर (वय-24) असे सुनेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सुनेची हत्या केल्यानंतर सासऱ्याने तिचा मृतदेह कापडाने झाकून ठेवला आणि मोहाडी ( Mohadi Taluka) पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. घडल्या प्रकारामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांसह गावकऱ्यांना धक्का बसला आहे.
मोहाडी पोलिसांनी प्राप्त माहितीवरुन आरोपी बळवंत ईश्वरकर (वय-57) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जो मृत सुनेचा सासरा आहे. त्याने आपण स्वत:च सुनेचीह हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अधिक माहिती अशी की, बळवंत ईश्वरकर याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सध्या तो मुलगा, सून आणि एका नातवासोबत रोहना गावात राहतो. बळवंत ईश्वरकर याला त्याच्या सूनेवर चारित्र्याचा संशय होता. त्यावरुन सून आणि सासरा यांच्यात सातत्याने वाद होत. घटना घडली त्या दिवशीही त्यांच्यात असाच वाद झाल्याचे समजते. (हेही वाचा, Mumbai: आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्यी मुलाने केली सावत्र बापाची हत्या; आरोपीला अटक)
पोलीस दप्तरी झालेल्या नोंदीनुसार, घटना घडली त्या दिवशी मृत प्रणाली हिचा पती शेतात गेला होता. पाठिमागे सासरा बळवंत ईश्वरकर आणि सून प्रणाली यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यातून चिडलेल्या सासऱ्याने घरातून कुऱ्हाड आणली आणि दारात भांडी घासत असलेल्या सून प्रणाली हिच्यावर घाव घातले. कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने अंगनात रक्ताचा पाट वाहू लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणाली हिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने घरात जाऊन कापड आणले आणि मृतदेहावर टाकले. नंतर जाऊन पोलिसांत आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.