Dr.Payal Tadvi Suicide Case Update: मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) डॉ. पायल तडवीच्या (Payal Tadvi) रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणी सिनियर डॉक्टर भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) या तिघींनाही अटक झाली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात त्यांना हजर करून सुनावणी होणार आहे. पायलला सतत जातीवाचक शेरेबाजी करून मानसिक त्रास दिला जात होता, तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर पायलने गळफास घेऊस आयुष्य संपवले असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. Dr. Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करा - तडवी कुटुंबीयांची मागणी
ANI Tweet
#UPDATE Medical student Payal Tadvi suicide case: Third accused doctor Ankita Khandelwal has also been arrested by Police. Details awaited. https://t.co/ql7qxkanWu
— ANI (@ANI) May 29, 2019
डॉ भक्ती मेहेरला (28 मे) दिवशी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर तर डॉ हेमा अहुजाला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. अंकितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पायलने 22 मे दिवशी आत्महत्या केल्यापासून या तिघी डॉक्टर फरार होत्या.
नायर हॉस्पिटलमध्ये डॉ. पायल तडवी ही शिकाऊ डॉक्टर होती. काल (28 मे) मार्डच्या कारवाईनंतर तिन्ही संशयित आरोपी सिनियर डॉक्टरर्सचं निलंबन करण्यात आलं होतं. राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणावर नायर हॉस्पिटल काय कारवाई करते? याबाबत अहवाल देण्यास आठवड्याभराची मुदत देण्यात आली आहे.