Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

एनसीपी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्त शिवनेरी किल्ल्यावर 'भगवा जाणीव' (Bhagwa Janiv) आंदोलन पुकारलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर (Fort Shivneri) कायमस्वरूपीचा भगवा झेंडा असावा यासाठी अमोल कोल्हे आग्रही आहेत. आज शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरीवरून निघून गेल्यानंतर शिवभक्तांसह शिवनेरी चढले. त्यांनी शिवाईची आरती देखील केली.

दरम्यान पुढील शिवजयंती पर्यंत शिवनेरीवर भगवा फडकला नाही तर आपण आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी काही शिवभक्तांसोबत ते फलक घेऊन काही वेळ बसले होते. दरम्यान हा निषेध नसून सध्यापूर्ती केवळ जाणीव करून देण्याच्या भावनेतून आंदोलन आहे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पहावं असं देखील म्हटलं आहे. Shiv Jayanti 2023: शिवनेरी वर VIP साठी शिवभक्तांना का अडवता? जाहीर कार्यक्रमात छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांसामोर मांडली व्यथा .

सरकार जम्मू कश्मीर मध्ये कलम 370 हटवू शकते, तर पुरातत्व खात्याच्या नियमामध्ये छोटासा बदल करून भगवा का फडकवू शकत नाही, असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. पुढील वर्षीच्या शिवजयंती पर्यंत शिवनेरीवर भगवा फडकला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.