BEST Bus (File Image)

कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये काल 9 डिसेंबरच्या रात्री एका बेस्ट बसने पादचारी आणि रस्त्यावरील गाड्यांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज बेस्ट कडून कुर्ला डेपो मधून चालवली जाणारी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कुर्ला स्थानकातून अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझला जाणारी बससेवा आज बंद आहे. त्यामुळे अनेकांना रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.

बेस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुर्ला बुद्ध कॉलनी भागात काल रात्रीच्या अपघातामुळे पोलीसांनी स. गो. बर्वे (कुर्ला स्थानक) मार्ग बंद केल्याने बसमार्ग ३७,३२०,३१९,३२५,३३०,३३२ ई, कुर्ला डेपो मध्ये शेवट असलेल्या तसेच बसमार्ग ३१०,३११,३१३,३१८ ई टिळक नगर येथे यु टर्न घेऊन जाणार आहे.या बस कूर्ला डेपोमध्ये न जाता सांताक्रुझ स्टेशन मध्ये जाणार आहेत. Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.  

बेस्ट कडून देण्यात आलेली माहिती

बस नंबर 310 पहिल्यापासूनच टिळक नगर येथे यु टर्न घेऊन वांद्रे ला जाते तशीच जाणार आहे. बससेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना रिक्षा चा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

अपघातातील बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा आरोप  

कुर्ला -अंधेरी मार्गावर काल बसचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी बस चालकाला चोप दिला आहे.सध्या चालक पोलिसांच्या अटकेत असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे.  या घटनेनंतर आज बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.