Beed Zilla Parishad Elections: भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेली राजकारणातील चुरस आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. परंतु, यावेळी मात्र, पंकजा मुंडे यांनी आधीच मैदान सोडत पराभव पत्करला आहे.
मुंडे कुटुंबियांसाठी नेहमीच बीड जिल्हा हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. परंतु, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच पंकजा मुंडे यांनी पराभव स्वीकारला आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमधून हे स्पष्ट झालं आहे.
‘राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. रात्रीच, बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट पंकजा यांनी केलं.
राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 4, 2020
दरम्यान, आज बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु, हायकोर्टाच्या आदेशामुळे या निवडणुकीचा निकाल मात्र 13 जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात महत्त्वाची निवडणूक असूनही पंकजा मुंडे मात्र परदेशी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे त्याचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदा बीडमध्ये दाखल झाले होते.
निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना मिळाला आणखी एक दणका; पीएफ कार्यालयाने दिले आहेत 'हे' आदेश
तसेच भाजप खासदार प्रीतम मुंडे या बीडमध्ये निवडणूक काळात तळ ठोकून बसल्या असल्या तरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याची कबुली दिली आहे.
आता मुंडे बहीण-भावाच्या या लढतीमध्ये खरंच पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागणार का हे बघणं महत्त्वाचा ठरेल.