बीड: विजेच्या खांबाला धडकून इंडिगो कार चा भीषण अपघात; चार जण ठार
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या जवळ तांदळा येथे गवते वस्ती लागत असणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर काल, 17  मार्च रोजी रात्री 12 च्या सुमारास एका इंडिगो कंपनीच्या कारचा भीषण अपघात (Car Road Accident)  झाल्याचे वृत्त समोर येत आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने या भरधाव कारचा अपघात झाला, यावेळी कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू (Deaths) झाला होता तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले होते, या जखमींना आजूबाजूच्या स्थानिकांनी तत्परतेने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता यावेळी उपचारांमध्ये या दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी केल्लेल्या तपासात या अपघातासाठी कार चालकच जबाबदार असल्याचा अंदाज आहे. महामार्गावर ही कार अत्यंत वेगाने धावत होती, त्याच वेगात वस्ती जवळील चिंचोळ्या मार्गावरही वाहन चालक ड्राइव्ह करत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे कारची विजेच्या खांबाला धडक बसली. हा प्रघात इतका जास्त भीषण होता की त्यात कार चा अक्षरशः चेंदा मेदा झाला. विजेचा खांब कार वर कोसळल्याने कार मधील दोन जण त्याखालीच दाबले गेले. तर अन्य दोघे गाडीत अडकून पडले होते.

दरम्यान, वेगाने वाहन चालवून मागील काही काळात अनेक अपघात झाले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात हे पुणे- मुंबई महामार्गावर झाल्याचे सुद्धा समजते. तर मागील आठवड्यात वरळी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात गाडी चालविणा-या महिला वाहनचालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडर आदळली आणि अपघात झाला होता.