Beed Road Accident: बीड जिल्ह्यातून दुसरी धक्कादायक घटना समोर येत आहे. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रुग्णवाहिकेत डॉ, राजेंद्र झिंजुर्के आणि वाहनाचा चालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रात्रा बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आष्टी तालुक्यातील दौलावडगावातील दत्त मंदिराजवळ एक ट्रक रात्रीच्या वेळी धामणगावकडून अहमदनगरकडे जात होती. डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदाक धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. या घटनेत वाहन चालकेचा जागीच मृत्यू झाला. रुग्णावाहिका चालक भरत लोंखडे, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे आणि डॉक्टर राजेंद्र झिंजुर्के असे या अपघातात मृत झाल्याची नावे आहे.
VIDEO | Several feared dead as ambulance collides with truck in Beed, Maharashtra. More details are awaited. pic.twitter.com/8TiT1e0Sal
— Press Trust of India (@PTI_News) October 26, 2023
या अपघातातमुळे रस्त्यावर बऱ्याच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच येऊन त्यांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. रुग्णलयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिका भरधावात असल्याची सांगितले जात आहे. मयत झालेल्यांचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोस्टमार्टसाठी शासकिय रुग्णालयात नेण्यात आले आहे.