ST Bus | (Photo Credits: MSRTC)

Beating Between Conductor And Passenger:  सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये मारामारीच्या घटना अनेक वेळा  घडतात. आता नांदेड जिल्ह्यात एसटी बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यातील भांडणाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात जोरदार भांडण सुरू असून बसमधील काही प्रवासी या भांडणाचा व्हिडिओ बनवत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ कंधार बस डेपोचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस दगडसांगवीहून कंधारच्या दिशेने येत होती. या बसचा चालक व्यंकट डांगे तर कंडक्टर संतोष कंडारे होता. दरम्यान, पाताळगंगा पाटी येथील प्रवाशी सूर्यकांत हे किरतवाड बसमध्ये चढले. कंडक्टरने तिकीट काढायला सांगितले. त्यानंतर प्रवाशाने त्याचे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करण्यास सांगितले. यानंतर कंडक्टरने आधार कार्ड तपासले असता नियमानुसार आधार कार्डावर मोफत प्रवास करता येत नसल्याचे आढळून आले.

व्हिडिओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Times Now Marathi (@timesnow_marathi)

कंडक्टरने प्रवाशाला पूर्ण तिकीट काढण्यास सांगितले. त्यानंतर प्रवासी कंडक्टरला म्हणाला, बस तुझ्या वडिलांची आहे का? यावरूनच वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. चालत्या बसमध्येच दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी दोघांनाही थांबवले.

कंडक्टरच्या तक्रारीनंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले, तेथे प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक भरपूर कमेंट करत आहेत.