Wife Murder With Cricket Bat: ठाण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. हरियाणातील (Haryana) एका मद्यधुंद व्यक्तीने पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांवर क्रिकेटच्या बॅटने (Cricket Bat) वार केले. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. कासारवडवली पोलीस स्टेशन (Kasarvadavali Police Station)च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिस्सारमधील खररालीपूर गावातील बेरोजगार असलेल्या अमित धरमवीर बागडी (वय, 29) याने पत्नी भावना (वय,24), मुलगा अंकुश (8) आणि मुलगी खुशी (6) यांची हत्या केली.
घरमालकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर तेथे धाव घेणाऱ्या पोलिसांच्या पथकांनी क्रिकेटची बॅट जप्त केली आहे. पोलिसांना या तिघांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडले. या घटनेचा तपास करणारे पोलिस अधिकारी शशिकांत रोकडे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीनुसार बागडी हा मद्यपी होता व तो बेरोजगार असल्याने निराश होता. त्यामुळे घरात दररोज भांडण होत असतं. (हेही वाचा - Pune News: भाजप युवा नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह, हडपसर येथील घटना)
दररोजच्या भांडणाला कंटाळून त्याची पत्नी भावना आपल्या दिर विकास धरमवीर बागडी याच्या घरी राहायला गेली होती. काही दिवसांपूर्वी अमित बागडी पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी भावाच्या घरी गेला. आज दुपारच्या सुमारास विकासला घरात त्याची वहिनी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेले आढळले. (हेही वाचा - Bus Accident: शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू)
घरमालक जयवंत एन. सिंघे यांच्या तक्रारीच्या आधारे, कासारवडवली पोलिसांनी या फरार व्यक्तीला पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे. रोकडे यांनी सांगितले की, आरोपी तीन दिवसांपासून त्याच्या भावाच्या घरी कुटुंबासह शांततेत राहत होता. मात्र, आरोपीने हे कृत्य का केले? यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.