Pune News: भाजप युवा नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह, हडपसर येथील घटना
पुण्यातील (Pune) भाजप (BJP) युवा शाखेत कार्यरत असलेला तरुणाचा रेल्वे रुळांवर मृतदेह आढळून आला आहे.
Pune News: पुण्यातील (Pune) भाजप (BJP) युवा शाखेत कार्यरत असलेला तरुणाचा रेल्वे रुळांवर मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील धुमाळ (46) असं मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी हडपसर रेल्वे स्थानकाजवळील (Deathbody) मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. (हेही वाचा-उल्हासनगरमध्ये भरधाव गाडीची 5 ते 6 वाहनांना धडक),
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हडपसर स्थानकाजवळ रेल्वे फाटकजवळ एक अज्ञात मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, सुनील धुमाळ यांचा अपघात झाला असावा, बहुधा त्यांना ट्रेनने धडक दिली असवी आणि धुमाळ आपल्या मुलीला शाळेत सोडल्यानंतर परतत असताना हा अपघात झाला आणि अपघातात त्याला आपला जीव गमवावा लागला.
Suicide of BJP Yuva Morcha Regional Contact Head Shakes Pune’s Political Sphere
— Punekar News (@punekarnews) December 20, 2023
पुणे रेल्वे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. फोनवर बोलत असताना मागून एका ट्रेनने धडक दिली. रेल्वे रुळाजवळ मृतदेहाची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जवानांना पाठवले. धुमाळे हे अनेक जखमी मृतावस्थेत आढळून आले. जवानांनी त्याची ओळख पटावी म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कुंटुबियांना माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की,या प्रकरणात अपघात म्हणून तपास करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2023 08:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

