Coronavirus: सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास, मोठी किंमत मोजावी लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद
Sharad Pawarm (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दिवसांकरिता संचारबंदीची (Lockdown) घोषणा केली आहे. यामुळे संपूर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढाकार घेत असल्याचे समजत आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी दुसऱ्यांदा फेसबूक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान शरद पवार यांनी देशावर घोंगावत असलेल्या कोरोना विषाणूचे राज्यातील जनतेला जाणीव करून दिली आहे. तसेच सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास आपल्याबरोबरोच पुढच्या पिढिलाही याची किंमत मोजावी लागणार, असाही इशारा त्यांनी जनतेला दिला आहे.

कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून महत्वाचे पावले उचलली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांतून नागरिकांना घराबाहेर पडू, असे वारंवार आवाहन केले आहे. तसेच या परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? याचेही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मार्गदर्शन केले आहे. दरम्यान, शरद पवार यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधत आहेत. नुकतेच शरद पवार यांनी फेसबूक लाईव्ह करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान, शरद पवार म्हणाले की, "नागरिकांनी घरातच थांबा, बाहेर पडू नका. संचारबंदीच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. हे संकट मोठे आहे. पुढचे काही महिने आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे,’ असे भाकित शरद पवार यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Lockdown: राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाड

शरद पवार यांचे फेसबूक लाईव्ह-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.