Basavraj Patil Left Congress: अशोक चव्हाणपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम, लवकरच भाजपात करणार प्रवेश

अशोक चव्हाणपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम ठोकलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा दिलाय. येत्या २ दिवसांत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला राम राम केल्याने लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  (Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर)

मुंबई, नांदेडमधील मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मराठ्यावाड्यातून सुद्धा मोठ्या नेत्यांने पक्षाची साथ सोडलीय. विशेष म्हणजे काँग्रेसला हा धक्का लातूरमध्ये बसला आहे. मुंबईतील मिलिंद देवरा आणि त्यानंतर बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का दिला.