Barber Shop & Salon reopen (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा 30 जूनपर्यंत ठेवण्यात आला असून अनलॉक 1.0 (Unlockd 1.0)  देखील सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले 3 महिन्यांपासून बंद असलेले केशकर्तनालये आणि सलून (Barber Shops & Salons) आजपासून सुरु झाले आहेत. सलून मालकांच्या मागण्यांचा विचार करत राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करत केशकर्तनालये आणि सलून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईत या नियमांचे पालन करत केशकर्तनालये आणि सलून सुरु करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात केवळ केशकर्तनालय सुरु करण्यासच मान्यता दिली आहे. इतर सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी सुरु करण्याची मान्यता नाही. Maharashtra Unlock 1: पुणे शहरात केश कर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यासाठी नियमावली; महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती

यासाठी घालण्यात आलेले काही महत्त्वाचे नियम:

1. केशकर्तनालयात गेल्यास केवळ केस कापण्यास मान्यता आहे. केस कापताना ग्राहक आणि केस कापणारा अशा दोघांनीही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.

2. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी म्हणजेच खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी, इत्यादी प्रत्येक 2 तासांनी सॅनिटाईज होणे आवश्यक आहे.

3.केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग, इत्यादी सेवा देता येतील, मात्र त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाहीत, याबाबत सूचना दुकानावर असाव्यात.

4. सर्व नियमांचे पालन करुनच दुकानदारांनी दुकाने सुरु करायची आहेत. जे दुकानदार कायद्याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्रात काल (27 जून) च्या दिवसभरात 5318 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. यानुसार सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 59 हजार 133 इतका आहे. कालच्या दिवसभरात 4430 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवरची एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 84 हजार 245 आहे.