अजित पवारांचा दणदणीत विजय, बारामतीचा गड पुन्हा अबाधित; गोपीचंद पडळकर यांच्यासोबत इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result 2019) आता जवळजवळ स्पष्ट होत आहे. यामध्ये 200 चा आकडा पार करण्याची भाषा करण्यारी युती सध्या 161 जागांवर अडखळत आहे. यंदाच्या निवडणुकीत भलेही सत्तास्थापनेसाठी आघाडी घेतली असो, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेली कडवी झुंज युतीसाठी घातक ठरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या धडाडलेल्या प्रचारतोफांनी ऐनवेळी निकालाचे चित्र पालटले. बारामती हा तर पवारांचा पारंपरिक मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री अजित पवार इथून प्रचंड मतांनी विजयी ठरले आहेत. बारामती येथून अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्यासोबत इतर अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.

बारामती येथे अजीप पवार यांच्यासह एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीपूर्वी अजित दादांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांना बारामती येथून निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिले होते. अखेर भाजपने गोपीचंद पडळकर यांना इथून उमेदवारी दिली. आता अजित पवार एका लाखाच्या मताधिक्क्याने बारामतीमधून निवडून आले आहेत. त्यानंतर पडळरांसह इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट आता जप्त झाले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019 Result: परळी मतदारसंघातील निकाल अनाकलनीय, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया)

अजित पवार यांच्या विजयामुळे हे नक्की झाले आहे की, कितीही प्रयत्न केला तरी पवारांच्या बारामतीच्या गडाला कोणी सुरुंग लावू शकत नाही. यामध्ये शरद पवार यांचे आतापर्यंतचे कर्तुत्व फार मोठी बजावत आहे. ईडीची चौकशी, मोदी – शाह यांनी केलेल्या वैयक्तिक टीका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढलेलेल ताशेरे अशा सर्व गोष्टींनंतरही पवार कुटुंबीय शांत राहून आपली खेळी खेळत राहिले. अखेर जनतेने मतांच्या रूपाने आपले प्रेम दाखवले आहे.