खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या प्रतिमा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन पुन्हा माफी मागणारे कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वेळी बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी ( Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा एकेरी उल्लेख करत बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar on Mahatma Gandhi) यांनी म्हटले की, 'स्वातंत्र्य हे महामा गांधी याच्या अहिंसावादामुळे नव्हे तर क्रांतिकारकांमुळे मिळाले आहे. महात्मा गांधी यांचे हिंदुत्व आणि अहिंसावाद हे दोन्हीही पक्षपातीच आहेत.' पुणे जिल्ह्यातील खेड येथील राजगुरुनगर येथे आयोजित एका व्यख्यानाच्या कार्यक्रमात बंडातात्या कराडकर बोलत होते.
बंडातात्या कराडकर यांनी नव्या वादाला तोंड फुटेल अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. भगतसिंग यांनी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवायचे ते अहिंसक मार्गाने मिळवायचे असे भगतसिंग यांना वाटायचे. परंतू, भगतसिंह यांच्या भ्रमाचा भोपळा पुढच्या तीन वर्षांमध्येच फुटला. 1922 मध्ये झालेल्या हत्यकांडाला समर्थन देण्यास महात्मा गांधी यांनी नकार दर्शवला. तेव्हा भगतसिंग यांना लक्षात आले की, महात्मा गांधी यांचा अहिंसावाद हा पक्षपाती आहे. त्यांचे हिंदुत्वही पक्षपाती असल्याचे भगतसिंग यांच्या लक्षात आले. (हेही वाचा, Bandatatya Karadkar Arrested: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले)
पुढे बोलताना, महात्मा गांधी यांचा म्हातारा असा उल्लेख करत बंडातात्या यांनी म्हटले की, या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचे नाही, असा परिणाम भगतसिंग यांच्या मनावर झाला. लोकमान्य टिळक यांच्या एका विधानाचा उल्लेख करत बंडातात्या म्हणतात, म्हाताऱ्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचे तर भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजार वर्षे लागतील. 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ते अहिंसेने मिळाले नाही. 1942 मध्ये क्रांतिकारकांची एक मोठी चळवळ उभा राहीली. या चळवळीमध्ये क्रांतिकारक गावोगावी पोलीस स्टेशन्स जाळू लागले. रेल्वेरुळ उखडून टाकू लागले. अनेकांनी सरकारी कचेऱ्या जाळल्या. त्यातून इंग्रजांनी बोध घेतला की, आता देश सोडण्याशिवाय पर्यायच नाही. आणि मग त्यांनी देश सोडला असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे.