
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण प्रयत्न करत आहेत. यातच नवीमुंबईकरांना विचारात पाडणारा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून मुंबई शहरात ये-जा करण्यासाठी 7 मे पासून प्रतिबंध आणण्यात येत आहे, अशा आशायाचे जाहीर आवाहनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून मुंबई शहरात ये-जा करण्यासाठी 7 मे पासून प्रतिबंध आणण्यात येत आहे, अशा आशयाच्या जाहीर आवाहनाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. सदर आवाहन फोटो नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; 'इथे' ऑनलाईन माहिती देण्याचं आवाहन!
ट्वीट-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून मुंबई शहरात ये-जा करण्यासाठी ७ मे पासून प्रतिबंध आणण्यात येत आहे अशा आशयाच्या जाहीर आवाहनाची फोटो इमेज सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. सदर आवाहन इमेज नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेली नाही, याची नोंद घेण्यात यावी. pic.twitter.com/s6sfuR38Vs
— NMMC (@NMMConline) May 5, 2020
कोरोना विषाणूने संपूर्ण भारतातच हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 14 हजार 541 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.