Balasaheb Thackeray's 6th Death Anniversary: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आज (शनिवार, १७ नोव्हेंबर) असंख्य शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी आणि राज्य तसेच देशभरातील अनेक मान्यवरांकडून आदरांजली वाहीली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतिदिन आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक शिवतिर्थावर (शिवाजी पार्क) दाखल होत आहेत. तर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनीही बाळासाहेबांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.
हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेबांना ओळखले जात असले तरी, त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते जागतिक किर्तीचे उत्कृष्ट व्यंगचित्रकार तर होतेच. पण, एक उत्कृष्ट वक्ता, चतुर आणि निडर राजकारणी, दिलखुलास मित्र आणि एक प्रतिभावान हस्तीही होते. केवळ पठडीतले राजकारणी न होता त्यांनी आपल्यातील मिश्कील व्यंगचित्रकार कायम जपला. त्यांना वक्तृत्वाची अमोघ देणगी लाभली होती. आपल्या भाषणातून समोर जमलेल्या असंख्य श्रोत्यांवर ते आपले गारुड फेकत असत. दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे अनेक क्षेत्रांतील दिग्गज त्यांचे मित्र होते. आयुष्यभर त्यांना जनतेचे प्रेम लाभलेच. परंतु, त्यांच्या निधनानंतर आजही ते राज्यातील जनतेच्या हृदयात आहेत. हे शिवतिर्थावर प्रत्येक वर्षी जमणाऱ्या गर्दीतून दिसते.
आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन ! pic.twitter.com/M94LcUFXOl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2018
शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम आपल्याला मार्गदर्शन करीत राहतील... pic.twitter.com/z60FSMU7fq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2018
#हिंदुहृदयसम्राट वंदनीय #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली ! pic.twitter.com/Ng1QQKFfH3
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) November 17, 2018
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन! #साहेबस्मृतीदिन pic.twitter.com/gPbA88NgZi
— Gajanan Kirtikar (@GajananKirtikar) November 17, 2018
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे स्मृतिस्थळाला सहकुटुंब भेट देऊन आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त होणारी गर्दी विचारात घेऊन पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे.