Maharashtra State Ministers Meeting Today Update: महाराष्ट्र राज्य मंत्रीमंंडळ बैठकीत आज बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला (Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme) मंंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही व्यक्ती अन्य राज्य किंंबहुना देशातील असली तरीही महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्यांंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, अपघात ग्रस्तांना 'Golden Hour' मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा फायदा होईल, योजनेंतर्गत जखमी व्यक्तीला 30 हजार रुपयांपर्यंत खर्च किंवा रुग्णालयात मोफत उपचार मिळतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी संंवाद साधताना सांगितले आहे.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. साधारण 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजनाचा समावेश सुद्धा यात असेल. मात्र औद्योगिक अपघात किंवा घरगुती अपघात, रेल्वे अपघाताचा यात समावेश होणार नाही असे सांंगण्यात आले आहे.
ANI ट्विट
State Cabinet has approved Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme. The Scheme will ensure accident victims receive immediate treatment in hospital. Under this scheme, a victim will get maximum benefit of Rs 30,000 or free treatment in hospital:Maharashtra Health Minister pic.twitter.com/uEieC80qtR
— ANI (@ANI) September 16, 2020
.दरम्यान, वरळी येथील राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होणार आहे. या योजनेच्या अमंलबजावणी साठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल, असेही टोपे यांंनी स्पष्ट केले आहे.