Car runs over toddler in Malvani (Photo Credits: ANI)

मुंंबईच्या (Mumbai) मालवणी परिसरात (Malwani Area) काही दिवसांंपुर्वी एक अत्यंंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समजतेय. आपल्या घराबाहेर खेळणार्‍या एका 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरुन भलीमोठी कार गेल्याची ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे, या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  होत असुन या व्हिडिओ वरुन मुंंबई पोलिसांंनी (Mumbai Police) कारच्या मालक व चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना 11 सप्टेंंबर रोजीची आहे. व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे ही घटना संध्याकाळच्या वेळेस घडल्याचा अंदाज लावता येईल.

ANI ने या घटनेचा शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही इथे पाहु शकता, कमजोर हृदयाच्या व्यक्तींंनी हा व्हिडिओ पाहु नये असा सल्ला आम्ही देतो. तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहिलेच असेल की, जेव्हा अपघात घडला तेव्हा कारचा वेग अगदी कमी होता. जेव्हा या लहानग्याच्या अंगावरुन कार गेली तेव्हा ड्रायव्हरला याची कल्पना आली होती आणि तो पुढे जाउन थांंबुन खिडकीतुन वळुनही पाहत होता मात्र साहजिकच भीतीमुळे त्याने तिथुन थेट पळ काढला. हा सर्व प्रकार घराबाहेरील CCTV कॅमेर्‍यात कैद झाल्याने हा पुढचा प्रकार उघड झाला.

Rajasthan Boat Tragedy: 45 यात्रेकरूंची नाव चंबळ नदीत उलटली; 10 लोकांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारकडून 1 लाखाची मदत जाहीर

दरम्यान, सुदैवाने या अपघातात अंगावरुन गाडी जाउनही चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. त्याला अपघातात दुखापत झाली होती मात्र त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले जिथुन त्याला प्राथमिक उपचार करुन लगेचच डिस्चार्ज देण्यात आल होता.