Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत (General Election Result 2024) बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीला मिळालेला विजय आणि संबंध देशभरात इंडिया आघाडीस मिळत असलेले यश म्हणजे देशातील वातावरण बतलत असल्याची पावती आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाला आलेला अहंकार भारतातील जनतेने नाकारला आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 'बच्चा अभी बडा हो गया है'

त्यांना नेता होण्याची घाई झाली आहे आणि ते अजून बच्चा आहेत असे हिनवणाऱ्या विरोधकांनाही रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला नेता होण्याची कोणतीही घाई नाही. आम्हाला फक्त जनतेला हे जनतेपर्यंत पोहोचवायचे होते की, भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते आम्हाला मान्य नाही. भाजपच्या अहंकाराला जनतेने स्वीकारु नये यासाठी आम्हाला त्यांच्या पर्यंत पोहोचायचे होते. आणि जे लोक मला बच्चा म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो की, 'बच्चा अभी बडा हो गया है', असेही रोहित पवार म्हणाले. (हेही वाचा, Indian General Election Results 2024: सुप्रिया सुळे यांचा विजय ते नितीश कुमार यांच्याशी चर्चा; शरद पवार स्पष्टच बोलले)

'मतदार, जनता यांचे आभार'

बारामतीमध्ये झालेला विजय आणि राज्य आणि देशभरात मविआ, इंडिया आघाडी यांना मिळत असलेले यश यांबाबत रोहित पवार यांनी कार्यकर्ता आणि मतदार, जनता यांचे आभार मानले. मविआतील सर्वच घटक पक्ष, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आमदार पवार यांनी आभार मानले आहेत. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्न आणि कष्टामुळेच हे यश मिळू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा -  Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री)

बारामतीच्या जनतेबद्दल खात्री- शरद पवार

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बारामतीमध्ये आमच्या पक्षाला चांगले मताधिक्य मिळत आहे. तसेच, बारामतीची जनता योग्य निर्णय घेईल याची खात्री आम्हा सर्वांना पहिल्यापासूनच होती. त्यामुळे बारामतीमध्ये काही वेगळा निर्णय लागेल, असे आम्हाला कधीच अपेक्षीत नव्हते. बारामतीच्या जनेतने कामावर आणि केलेल्या कामाच्या मेरीटवर मतदान केले, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, Nandurbar Lok Sabha Result 2024: नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; हिना गावितचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव)

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीला जे यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे श्रेय सर्व मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाते. त्यांनी दिवसरात्र मेहनत केली. शिवाय, आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (UBT) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राज्यातील नेत्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी चिकाटीने काम केले आणि आपल्या पक्षासह मित्रांनाही बळ दिले. मात्र, एक बाब निश्चित आहे, उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आम्हाला हिंदी पट्ट्यात अधिक काम करावे लागेल, असेही पवार यांनी म्हटले.