कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर आतापर्यंत सामान्य व्यक्तींपासून ते राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. याच दरम्यान आता महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन सुद्धा केले आहे.(Curfew In Pune District: अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार)
बच्चू कडू यांच्या आधी नितीन राऊत यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली होती. त्यांनी असे म्हटले होते की, मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करावी.(Coronavirus Update: महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णसंख्येत वाढ होण्यापेक्षा जास्त; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी)
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 19, 2020
दरम्यान, या आधी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. तर सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच अद्याप कोरोनावर ठोस लस उपलब्ध नसल्याने जगभरातील संशोधक आणि वैज्ञानिक त्यासंबंधित अभ्यास करत आहेत. दुसऱ्या बाजूला सर्व नागरिकांना कोरोनावरील लस कधी उपलब्ध होईल याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. तसेच जगभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड सेंटरसह क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरीही मृत्यूदर कमी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. तर सीरम इंन्सिट्युट ऑफ इंडिया यांनी 2024 च्या अखेर पर्यंत लस उपलब्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.