Curfew In Pune District: अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार
Curfew In Pune District: पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
Curfew In Pune District: पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आदी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - Chhagan Bhujbal: निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करा; छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी पुण्याच्या विधानभवन सभागृहात घेतला आढावा.अनावश्यक गर्दी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घेण्याच्या प्रशासनाला सूचना pic.twitter.com/TdBnrjBwX9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 18, 2020
यावेळी अजित पवार म्हणाले की, शहरी भागासह ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असं आवाहनदेखील अजित पवार यांनी यावेळी केलं.
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2020 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

