
रत्नागिरी (Ratnagiri) मधील गणपतीपुळेच्या (Ganpatipule) समुद्र किनारी असलेला बेबी व्हेल मासा अखेर मृत्यूमुखी पडला आहे. या बेबी व्हेलला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. त्याला 15 नोव्हेंबरला पुन्हा पाण्यातही सोडलं होतं. पण संध्याकाळी तो पुन्हा किनार्यावर आला अणि अखेर त्याचा मृत्यू झाला. 13 नोव्हेंबरला पहिल्यांदा हा मासा दिसला होता. त्यानंतर सुदैवाने त्याला डिहायड्रेशन किंवा त्याची इंद्रिय बंद पडण्याची समस्या न आल्याने त्याला अनेकदा पाण्यात सोडले होते पण ओहोटीच्या पाण्याने तो पुन्हा समुद्रकिनारी आला होता.
गणपतीपुळ्यात MTDC च्या रिसॉर्ट जवळच व्हेल मासा वाळूत रूतल्याचं निदर्शनास आलं. नंतर प्राणी, मत्स्यतज्ञ, वनविभाग, ग्रामस्थ, मच्छिमार सार्यांनीच त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले होते. जेसीबीचा वापर करून त्याची वाळूतून सुटका देखील करण्यात आली होती. शरीरावरील त्वचा मृत पडू नये म्हणून पिल्लाला जगवण्यासाठी ओल्या कापडात गुंडाळून वारंवार वारंवार पाणी मारले जात होते. सलाईन आणि अॅन्टिबायोटिकचा वापर केला होता. तटरक्षक दलाच्या नौकांच्या मदतीने त्याला किनार्यापासून दूर खोल समुद्रात सोडण्यात आले पण तो पुन्हा परत आला आणि 40 तासांपासून त्याला जगवण्याची सारी धडपड संपली.
व्हेल मासा शरीराने अवाढव्य असतो. पाण्यात तो तरंगत असल्याने स्वतःच्या शरीराचं त्याला वजन जाणवत नाही पण किनार्यावर आल्यास त्याच्या वजनानेच काही इंद्रियं दबली जातात आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्या तुलनेत या बेबी व्हेलने खूपच जिद्द दाखवली पण तो फार काळ तग धरू शकला नाही.
व्हेल देखील सस्तन प्राणी असल्याने लहान पिल्लांना आईच्या दूधाची गरज असते.