अवनी T-1 वाघीण बछडे ( फोटो सौजन्य- Pixabay)

नरभक्षक अवनी वाघिणीच्या (Tigress Avni) एका बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. काही दिवसांपूर्वी नरभक्षक अवनी वाघिणीची गोळी घालून हत्या करण्यात आली. तिला दोन बघडे असून C1, C2 अशी त्यांची नावे आहेत. या दोघांपैकी मादी बघड्याला पकड्यात वनविभागाला यश आलं आहे. 'अवनी'ला मारण्याचा उद्देश नव्हता, स्वसंरक्षणातून तिच्यावर गोळी झाडली- नवाब अजगरअली

अवनी वाघिणीच्या जेरबंद केलेल्या बघड्याला नागपूर येथील गोरेवाडा येथे पाठवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बछड्याचा शोध अद्याप सुरु आहे. अवनी वाघिण मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार- मुख्यमंत्री

अवनी वाघिणीच्या हत्येनंतर दोन बछड्यांना जेरबंद करण्यात वनविभागाने मोहिम सुरु केली. अंजी परिसरात सुरु असलेल्या या मोहीमेमुळे जंगलात वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिकिक्त कोणालाही जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर 80 एकर परिसरात कुंपण घालण्यात आले आहे. बघड्यांच्या सुरक्षिततेसाठी या भागातील सर्व रस्त्यांवरही नाकाबंदी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नरभक्षक अवनी वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आले होते. अवनीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र यावर  देशभरातून टीका झाली.  अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अनेक प्राणीप्रेमींकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. अवनीला न्याय मिळून देण्यासाठी #जस्टीसफॉरअवनी हा हॅशटॅग देखील सोशल मीडियात ट्रेंड होत होता.