नरभक्षक असलेल्या टी-1 वाघीणीचा वनविभागे खात्मा केला आणि यवतमाळ येथील पांढरकवडा नागकिरकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरिकांनी वाघिणीचा प्रचंड धसका घेतला होता. इतका, की ती ठार झाल्याचे समजताच नागिरकांनी अक्षरश: फटाके फोडून आनंद साजरा कला. दिवाळीसाठी बनविलेलेले लाडू नागरिकांनी वाघीण मेल्याच्या आनंदात एकमेकांना वाटले. दरम्यान, आता वाघीण तर मेली पण, तिचे दोन बछडे आणि एक नरही जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यानी वनविभागाकडे केली आहे. गावकऱ्यांच्या या मागणीला वनविभाग कसा प्रतिसाद देते याबाबत उत्सुकता आहे.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून जंग जंग पछाडले जात होते. त्यासाठी वनविभागाने तब्बल पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज असा लवाजमा तैनात केला होता. विशेष म्हणजे वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही तैनात करण्यात आले होते. पण, वाघिण इतकी बिलंदर की, इतका खटाटोप करुनही ती वनविभागाच्या हाती लागत नव्हती. अखेर, तिचा ठावठिकाणा शोधून काढत तिला ठार करण्यास वनविभागाल यश आले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (हेही वाचा, यवतमाळ: 14 जणांचा जीव घेणारी नरभक्षक T1 वाघीण वनविभागाकडून ठार; दहशत संपली)
#Maharashtra: Locals in Yavatmal celebrate after 'man-eater' tigress Avni (T1) was killed in last night. She had allegedly killed 14 people. pic.twitter.com/wxN0yvT0Xw
— ANI (@ANI) November 3, 2018
एकूण १४ जणांचे प्राण घेतल्यामुळे या वाघीणीची भीती परिसरात प्रचंड मोठ्या परिसरात पसरली होती. वाघीणीच्या भीतीने नागरिकांनी गावाबाहेर पडणे सोडल्यामुळे शेतीची कामेही रखडली होती. त्यामुळे या वाघीणीचा काहीतरी बंदोबस्त करावा ही मागणी नागरिकांनी वनविभागाकडे सातत्याने लाऊन धरली होती. केळापूर, राळेगाव, कळंबसह पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी वाघिणीची सर्वाधीक दहशत आणि वावरही होता. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीने आपला वावर वाढवला होता. त्यामुळे इथेही भीतीची छाया कायम होती.