Mumbai: रिक्षाचालकावर दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याने मृत्यू
Death (Photo Credits-Facebook)

Mumbai: मुंबईतील धारावीत एका 30 वर्षीय रिक्षाचालकावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रविवारी सकाळी गोळीबार करण्यात आलेल्या रिक्षाचालकावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Fraud: बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून आरटीजीएस फॉर्म बदलल्याप्रकरणी अंधेरीतील एका व्यक्तीला अटक)

आमिर अनिस खान असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सकाळच्या वेळेस मिठी नदीच्या येथे पिला बंगलो परिसरात त्याच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याला तातडीने महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Palghar: पालघरमध्ये मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला अटक)

दरम्यान, या प्रकरणी एका महिलेची सुद्धा चौकशी केली जात आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे की, तिचा या घटनेत समावेश आहे. गोळीबार करण्यात आलेल्या आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरु करण्यात आला आहे. तसेच अद्याप या प्रकरणी अटक करण्यात आले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.