rickshaw | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पुण्यामध्ये अ‍ॅप बेस्ड रिक्षा सेवा घेणार्‍यांमध्ये भाड्यावरून सुरू असलेला संभ्रम आता पुणे आरटीओ (Pune RTO) कडून संपवण्यात आला आहे. सोमवारी (7 एप्रिल) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ग्राहकांना आगाऊ विचारून ते मीटर प्रमाणे भाडं आकारू शकतात. आम्हाला उबरकडून कोणताही मेसेज मिळालेला नाही. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणी रोखणे हे आमचे प्राधान्य आहे. मीटरने आकारलेले भाडे RTA-approved आहे. जर चालकांनी प्रवासापूर्वी मीटरने आकारणी करण्याचे जाहीर केले तर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. असे आरटीओ कडून सांगण्यात आले आहे.

अ‍ॅपच्या सुरुवातीच्या भाडे अंदाजाच्या विरोधात, ड्रायव्हर्सकडून प्रवाशांकडून जास्त मीटर भाडे किंवा अगदी जास्त रक्कम आकारली जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मार्चपासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार, उबरच्या प्लॅटफॉर्मवर दाखवलेले ठिकाणाचे भाडे फक्त सूचक असेल. प्रवासी आणि ऑटो चालकाला अंतिम भाडे ठरवायचे होते. उबर कोणतेही कमिशन आकारणार नाही आणि भाडे चालकाला रोख किंवा UPI द्वारे दिले जावे. नक्की वाचा:  ‘Uber for Teens’: जाणून घ्या उबर च्या नियमित सेवेपेक्षा या सेवेमध्ये काय खास? 

Uber कडून त्यांच्या प्रवक्त्याने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवरून ऑटोरिक्षा चालवल्या जाणाऱ्या सेवा आता Software-as-a-Service (SaaS) नावाच्या नवीन सेवा मॉडेलकडे वळल्या आहेत.

दरम्यान अनेक प्रवाशांच्या आरोपानुसार, Uber App वर दाखवलेल्या भाड्यापेक्षा खूपच जास्त भाडे आकारले जात होते. यामध्ये अनेकदा 50-100 रुपये जास्त पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.

Aggregator License नसतानाही सेवा सुरूच

गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) Aggregator Licenses नाकारले असले तरी Ola आणि Uber दोन्ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमध्ये काम करत आहेत. यामुळे अंमलबजावणी आणि नियामक देखरेखीबद्दल आणखी प्रश्न उपस्थित होतात.