Auto Rickshaw Drivers Saved Woman's Life: मुंबई (Mumbai) येथील सुमन नगर परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे ब्रिजखाली पेटलेल्या अवस्थेत एक महिला जिवाच्या अकांताना मदतीची याचना करताना पाहूनही कोणाचे हृदय द्रावले नाही. रस्त्याने जाणा-येणाऱ्या अनेक पादचारी आणि वाहनांतील नागरिकांनी तिच्याकडे पाहिले आणि माना हालवत मार्गक्रमण सुरु ठेवले. दरम्यान, ऑटोचालक असलेल्या मोहम्मद इस्माईल शेख (Mohammad Ismail Shaikh) याच्यातील मानवता जागी झाली. त्याने महिलेच्या अंगावर रिक्षातील बॉटलने पाणी ओतले आणि तिला रिक्षात घेऊन हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला 10% भाजली असून, वेळीत उपचार दिल्याने तिची प्रकृती स्थिर आहे.
मोहम्मद इस्माईल शेख हा ऑटोरिक्षा चालक आहे. दररोज संख्य प्रवाशांना भाड्याने रिक्षा उपलब्ध करुन द्यायची आणि उदरनिर्वाह करायचा अशी त्याची दिनचर्या. दरम्यान, मटा ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद इस्माईल शेख याने ब्रिजखाली एक महिला जिवंत जळताना पाहिली. महिला मदतीची याचना करत असतानाच इस्माईल धावला. त्याने बॉटलने पाणी मारुन महिलेच्या वस्त्रांना लागलेली आग विझवली. त्यानंतर तिला घेऊन थेट सायन रुग्णालय गाठले. ज्यामुळे महिलेला उपचार मिळाले. मोहम्मद इस्माईल शेख या रिक्षाचालकाच्या रुपात या महिलेसाठी चक्क देवदूत आल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. (हेही वाचा, Bhandara Crime News: सासऱ्याचं ताळतंत्र सूटलं, कुऱ्हाडीने घाव घालून सुनेची हत्या; मोहाडी पोलिसांसमोर आरोपीचे आत्मसमर्पण)
प्राप्त माहितीनुसार, ही घटना बुधवारी (14 जून) रोजी सकाळी आठ वाजणेच्या सुमारास घडली. पीडित महिला अण्णाभाऊ साठे ब्रिज जवळील बस स्टॉपवर आली. या वेळी तिचा पती पाठीमागून आला. त्याने अचाकन तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि लाईटरने आग लावली. यात महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. ज्यामुळे महिला घाबरली अस्वस्थ झाली. आगीच्या चटक्यांनी वेदना होऊ लागल्याने महिलेने आरडाओरडा करत मदतीची याचना सुरु केली. दरम्यान, उपस्थीतांपैकी कोणीही मदतीला धावले नाही. अखेर मोहम्मद इस्माईल शेख याने इतर कोणताही विचार न करता महिलेला मदत केली.