![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Accident03-784x441-380x214.jpg)
नवे वर्ष साजरा करुन परतणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील देवगिरी किल्ला (Devgiri Fort) परिसरात 1 जानेवारीच्या रात्री 2 वाजता घडली. या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहे. स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन विहिरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे संबंधित तरुणांच्या कुटुंबियांवर दुख:चे कोसळले आहे.
या अपघातात सौरभ विजय नांदापुरकर (24, रा. रोकड हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (30, रा. पुंडलीनगर) या दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला आहे. तर, नितीन शिशीकर (34, रा. रोकडा हनुमान कॉलनी), प्रतीक कापडिया (30, रा. खाराकुंवा) आणि मधुर प्रवीण जयस्वाल (30, रा. शहाबाजार, चेलीपूर) हे तिघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. नितीन, प्रतिक आणि मधुर यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संबधित तरुणांनी मद्यप्राशन केले होते का? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. हे देखील वाचा- New Year's Eve 2019: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील मोक्याची ठिकाणी बदलण्यात आली वाहतूक; पाहा कोणते आहेत मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत वाहन कोसळल्याची माहिती कळताच दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.