लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार (Rape) केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) येथील शार्दुलवाडी (Shardulwadi) परिसरात घडली आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच शाळेत शिकले असून ते गेल्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तेव्हापासून आरोपीने तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणून पीडितासोबत वारंवार शरीरसंबध प्रस्थापित केले. परंतु, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने आरोपी विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
योगेश शिवराम पवार (20) असे आरोपीचे नाव असून तो शार्दुलवाडी येथील रहिवासी आहे. योगेश आणि पीडित हे चारवर्षापूर्वी वेरुळ येथील शाळेत सोबत जायचे. दरम्यान, योगेशने तिच्यासोबत जवळीक वाढवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास गावात तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत होता. एवढेच नव्हेतर, मी तुझ्याशी लग्न करेल असे म्हणत त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. परंतु, पीडिताने लग्नाचे विचारल्या घरच्याविरोधात जाऊन लग्न करु, असे खोटे आश्वासनही द्यायचा. मात्र, आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात अल्यानंतर तिने हा सर्वप्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे देखील वाचा- Gang Rape In Jalgaon: सामूहिक बलात्कार पीडित युवतीला पाजले विष, उपचारादरम्यान मृत्यू; जळगाव येथील थरारक घटना
त्यानंतर पीडिताने खुलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे हे करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वृत्तात दिली आहे.