औरंगाबाद: शहागंज परिसरात पोलिसांनी केली घरात डांबलेल्या 23 प्राण्यांची सुटका
Aurangabad Police (Photo Credits: Twitter)

औरंगाबादेतील शहागंज (Shahgunj) येथील 23 जनावरांना एका घरात कोंबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक पोलिस तपास सुरू असल्याची माहिती सिटी चौक पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर संभाजी पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही जनावरं डांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास केल्यानंतर सुमारे 23 प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. ही जनावरं बकरी ईद साठी कुर्बानी म्हणून डांबली असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे.

देशभरात उद्या (12 ऑगस्ट) बकरी ईदचा उत्साह आहे. या सणानिमित्त प्राण्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना बकरे, गोवंश, उंट अशा प्राण्यांना शहागंज परिसरातील निजामुद्दीन चौकात विक्रीसाठी आणले असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी काही भागात कारवाई केली. या धडक कारवाईमध्ये एका घरात 23 जनावरं आढळली. बकरी ईद निमित्त फ्लॅट मध्ये कुर्बानी देण्यास मनाई, मुंबई उच्च न्यायलायचा निर्णय

ANI Tweet

शहागंज परिसरामध्ये पोलिस कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पोलिस तपास सुरू आहे.