Aurangabad Municipal Corporation | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

Aurangabad Municipal Corporation Deputy Mayor Elections 2019: औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) उपमहापौर निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) उमेदवार राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी बाजी मारली. ही बाजी मारताना शिवसेनेला एमआयएम (AIMIM) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचे 29,अपक्ष 12, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 2 आणि एमआयएम 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर वाढलेल्या संख्याबळाच्या आधारे राजेंद्र जंजाळ विजयी झाले. उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहात एकूण 100 नगरसेवक उपस्थित होते. त्यापैकी एकूण 51 मतं मिळवत राजेंद्र जंजाळ विजयी झाले.

दरम्यान, उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी उपमहापौर पद न मिळाल्याने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिकेत काँग्रेस पक्षाचे एकूण 11 नगरसेवक आङेत. त्यापैकी 6 नगरसेवकांनी शिवसेना उमेदवार मतदान केले. तर, 3 नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिले. काँग्रेसचे उर्वरीत नगरसेवक तटस्त राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण 4 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. तर दोघे गैरहजर राहिले. (हेही वाचा, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक 2019: अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले तर, उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड; भाजपची सपशेल माघार)

दरम्यान, उपमहापौर पद निवडणुकीवेळी एमाआयएम पक्षाच्या दोन नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. तर, 5 नगरसेवक अनुपस्थित राहिले. एकाने भाजप प्रणित अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी या 6 नगरसेवकांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली आहे.