देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार गेल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता औरंगाबाद हा सुद्धा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. येथे आणखी 34 कोरोनासंक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजार 942 वर पोहचला आहे. त्यापैकी एकूण 8159 रुग्णांची प्रकृती सुधारली असून 437 जणांचा बळी गेला आहे. तर सद्यच्या घडीला 4346 जणांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. त्याचसोबत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑक्सिजन युक्त असलेल्या बेड्सची सुविधेसह क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकिय कर्मचारी रुग्णांवर अहोरात्र उपचार करुन त्यांची प्रकृती सुधरावत आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी 'मिशन बिगिन अगेन' नुसार काही गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.(नागपुर येथे वाढत्या COVID19 च्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू लागू, अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार)
#औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२९४२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ८१५९ #रुग्ण बरे झाले असून ४३७ जणांचा #मृत्यू झाला, तर ४३४६ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. @InfoAurangabad #COVID__19 #CoronaVirusUpdates
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 26, 2020
दरम्यान, काल 25 जुलै पर्यंत देशात एकूण 3 लाख 66 हजार 368 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण हे कालच्या दिवसातील आहेत. यासोबतच कालच्या 257 जणांच्या मृत्यूसह आजवर देशात इतके मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणजेच मुंबईत सुद्धा काल 1090 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 07 हजार 981 इतकी झाली आहे.