औरंगाबादमध्ये (Aurangabad) मंगळवारी बहिण-भावाची हत्या (Double Murder Case) करून दीड किलो सोने व रोख साडेसहा हजार रुपये पळवल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. या दुहेरी हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृतांच्या चुलत भावाने आणि त्याच्या दाजीने चोरीच्या उद्देशाने त्यांचा घात केल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पहिल्यांदा चुलत भावास ताब्यात घेतले. मात्र, या कृत्यात त्याचे दाजींचाही समावेश असल्याचे त्याने माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या दाजीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल हस्त केल्याची माहिती समोर आली आहे.
किरण खंदाडे आणि सौरभ खंदाडे अशी हत्या झालेल्या बहिण भावाची नावे आहेत. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आई-वडिल परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहते. मात्र, काही कामानिमित्त लालचंद आपल्या पत्नी व एका मुलीला घेऊन जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते.रात्री 8 च्या सुमारास लालचंद हे घरी परतले. मात्र, वाहनाचा हॉर्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले असता बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह त्यांना दिसले. हे देखील वाचा- Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक
सतिश काळुराम खंदाडे (20) पाचनवडगांव, अर्जुन देवचंद राजपुत (24) रा.रोटेगांव रोड वैजापूर अशी आरोपींची नाव आहेत. दोघांची हत्या करुन घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले पळवले होते. ही हत्या घरातील सोने आणि शेतीच्या वादातूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या शिवाजी नगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात किरण शिक्षण घेत होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमध्ये महाविद्यालय बंद असल्याने ती गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादेत आपल्या आई-वडिलांजवळ घरी आली होती. तर लहान भाऊ सौरभ हा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.