Aurangabad Crime: भांडण सोडविणाऱ्या पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबाद येथील घटना
(Archived, edited, symbolic images)

भांडणात मध्यस्ती करायला गेलेल्या पोलिसाचाच गळा आवळण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad ) जिल्ह्यातील लासुर रेल्वे स्टेशन बस स्थानक परिसरात घडली. पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा विनायक पवार यांच्यासोबत ही घटना घडली आहे.  भांडणामध्ये आरोपीने चक्क पोलिसाच्याच गळ्यात दोरी अडकवून त्यांना गळफास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकारामध्ये पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी मोठ्या शताफीने आपली सुटका करुन घेतली. तसेच औरंगाबाद पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (Aurangabad Crime) दाखल केला.

प्राप्त माहितीनुसार, लासुर बसस्थानक परिसरात विशाल मुंदडा यांचे फिल्टरचे दुकान आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांसोबत दीपक मारुती वाघचौरे, गणेश मारूती वाघचौरे यांचा काही कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि भांडण सुरु झाले. दरम्यान, या भांडणाची माहिती कळताच शिल्लेगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, Aurangabad Cyber Crime: औरंगाबादमध्ये एका व्यक्तीला मोफत जेवण ऑर्डर करणे पडले महागात, अज्ञाताकडून 89 हजार रुपयांची फसवणूक)

पोलिस घटनास्थळी पोहोचले तोव्हा भांडण सुरुच होते. पोलिसांनी भांडण सोडविण्याचा आणि मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात दीपक वाकचौरे याने कॉन्स्टेबल पवार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यातच त्याने दोरी घेऊन कॉन्स्टेबल पवार यांचा गळा आवळला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यातून पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी स्वत:ची शताफीने सुटका करुन घेतली. या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, पोलिसाचाच गळा आवळला जात असल्याचे पाऊनस नागरिकही मदतीला धावून आले. त्यानी कॉन्स्टेबल पवार यांच्या गळ्यातील दोरी काढण्यास मदत केली. या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे. पोलिसांनी दीपक मारुती वाघचौरै याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.