गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास मान्यता दिली असून, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. आता माहिती मिळत आहे, या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणतात, 'औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ झाले. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करुन दाखविले.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)