औरंगाबाद (Aurangabad) येथील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यात नळदुर्ग (Naldurgh) येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या नदीपात्रामध्ये आज (20 एप्रिल) एक दुर्दैवी अपघात झाला आहे. सेल्फी घेण्याच्या नादामध्ये बोट उलटून तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
नळदुर्ग येथील एका कुटुंबातील मुलं किल्ला पाहण्यासाठीआले होते. किल्ला पाहून झाल्यानंतर बोरी नदीपात्रामध्ये बोटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बोट किनार्याकडे येत असतानाच एकजण सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावला. मात्र त्यावेळेस बोट कलंडली आणि चिमुकले पाण्यात पडले. या बोटीमध्ये लाईफ जॅकेटची सोय होती त्यामुळे सहा जणांना वाचवण्यात यश आलं मात्र तीन चिमुकल्यांचा जीव गेला. इजहान एहसान काझी (वय -5), सानिया फारुख काझी (वय – 8) आणि अल्मास शफी जहागीरदार (वय 8) अशी मृतांची नावं आहेत.
स्थानिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे संचालक कफील मौलवी यांचे ते नातलग असल्याचे सांगण्यात आले आहेत.