Hasan Mushrif | (Photo Credits: Twitter)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election 2021) रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने ने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नोटिस बजावली आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत काढण्याचा राज्य शासनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. राज्याचे मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री आणि निवडणूक आयोगाला ही नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यात येत्या 15 जानेवारीला 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण काढणा-या सोडती देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र पदाच्या आरक्षण काढणाऱ्या सोडती देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 15 डिसेंबर रोजी यापूर्वीच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित करणाऱ्या सर्व सोडती रद्द करत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय जाहीर केला.हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election 2021: तब्बल 2 कोटी रुपयांच्या बदल्यात उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध; बोली लावून थांबवली निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द झालं आहे. ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतीचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे.

सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळं 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं.